महाराष्ट्र शूर वीरांची भूमी आहे,थोर संतांची भूमी आहे,प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्याची भूमी आहे आणि महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र माझ्या शिवरायांची भूमी आहे.दीनदलीत,वंचित,कामकरी,कष्टकरी जातीपातीचे राजकारण न करता गुण्यागोविंदाने सर्व समभाव बंधूभाव याचा आदर करीत एकोप्याने वास्तव्य करीत होते.
जातीपातीचा राजकारण आज महाराष्ट्रात सुरू होऊन खून,दरोडे,बलात्कार रोजच्या रोज वाढत जाताना दिसतो आहे. राज्याची अब्रू वेशीवर टांगल्या गेलेली आहे,असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.कारण गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाडून आलेली आहे.दिवसा ढवळे होणारे बलात्कार आणि खून दरोडे रोजच्या रोज होत असतील तर महाराष्ट्राची वाट लागायला विलंब होणार नाही,हे इथं खेदाने नमूद करावेसे वाटते.
एक दिवस महाराष्ट्र देखील युपी किंवा बिहार होऊन जाईल इतकी भयंकर बिकट अवस्था आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय.राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येऊन आजच्या घडीला महिना देखील उलटला नाही आणि असले प्रकार कानावर ऐकू यायला लागले तर राज्यातील सरकारची नितिमत्ता गहाण पडते की काय ? अशी खचखच मनात व्हायला लागते आणि ती सहाजिकच आहे.
मग बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संजय देशमुख असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी असो किंवा मूल तालुक्यातील रितिक शेंडे असो होणाऱ्या घटनेचा सारासार विचार करायला गेला तर नवीन नवनिर्वाचित सरकारची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत किंवा राज्य सरकारची नीतिमत्ता गहाण पडलेली आहे,अशी शंका कुशंका उपस्थित होतांना दिसतो आहे.वेळीच सावध व्हा आणि अन्यायाविरुद्ध दंड ठोप थोपटायला शिका याशिवाय राज्यातील जनतेकडे काहीच पर्याय उरलेला नसेल.
|| जागे व्हा वीरांनो वैऱ्याची रात्र आहे;
जिकडे बघावे तिकडे अन्याय होत आहे ||